Wednesday, 11 December 2013


अॅड. विलास नार्इक यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य पुरस्कार प्रदान.
अलिबाग
दिनांक: 12/11/13
    
     अलिबाग येथील नवोदित साहित्यिक अॅड. विलास नार्इक यांचे पहिलीच साहित्यकृती, अनुभव कथन एक ना धड याला राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर लक्षणीय गदय साहित्य पुरस्कार नुकताच एका शानदार सोहळयात आजरा जिल्हा-कोल्हापुर, येथे जेष्ठ साहित्यिक कवी श्री. महेश केळूस्कार यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला आहे.
     श्रीमंत गंगाबार्इ वाचन मंदिर आजरा, कोल्हापूर या वाचनालयाचे 125 व्या वर्धापनदिनानिर्मित्त हे पुरस्कार  वितरीत करण्यात आले दिनांक: 7 नोव्हेंबर 2013 रोजी हे पुरस्कार डॉ. अंजली देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली शिव सहयाद्री चॅरीटेबल, पुणे यांचे अध्यक्ष मा. राजेंद्र यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजरा येथे  एका शानदार सोहळयात प्रदान करण्यात आले. श्री. विलास नार्इक यांच्या सोबतच नाटयलेखन पुरस्कार लेखक श्री. विजय साळवी, मृत्यूंजयकार श्री. शिवाजी सावंत कांदबरी पुरस्कार, सौ. माधवी तळवळकर पुणे बालसाहित्य पुरस्कार श्री. सुर्यकांत मालूसरे यांना प्रदान करण्यात आले.
     नवोदीत लेखकाला राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत करून आपल्या पहिल्याच साहित्यकृती मानाचा पुरस्कार दिल्याबदद्ल आयोजकाचे आभार मानून आपल्या मनोगतामध्ये श्री. विलास नार्इक यांनी सामाजिक व्यवसायिक जीवनात विविध व्यतिरेखा कशा भेटत गेल्या याचे मर्मभेदी विवेचन केले.
     श्री. विलास नार्इक यांची एक ना धड कळत नकळत ही दोन पुस्तके प्रसिध्द झाली असून जीवन सुंगध हे तिसरे कथासंग्रह पुस्तक लवकरच दिलीपराज प्रकाशन, पुणे या संस्थेमार्फत प्रकाशित होत आहे.
     साध्या सोप्या मनाचा ठाव घेणार्‍या लिखाणामुळे अनुभवकथनामुळे श्री. विलास नार्इक यांना महाराष्ट्रातून वाचक वर्ग मोठया प्रमाणात प्रोत्साहित करीत आहे. दिलीपराज प्रकाशन, पुणे यांचे वेबसार्इट ‘‘बुक गंगा डॉट कॉम’’ याद्वारे अंतरराष्ट्रीय पातळीवर ही श्री. विलास नार्इक यांच्या पुस्तकांना चांगला वाचक वर्ग लाभलेला आहे.
     यापूर्वी विलास नार्इक यांना कै. राजाभाऊ राजवाडे साहित्य पुरस्कार रायगड भूषण पुरस्कार, दत्ता पाटील स्मृती पुरस्कार अशा अनेक या पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले आहे.

............

1 comment: