Tuesday, 17 December 2013

                     ज्येष्ठ नेता
           ‘‘ आज मी थरथरतोय ! ‘‘
दमलोय, आधाराशिवाय मला चालता येत नाही. बोललेले धड लक्षात रहात नाही. ठरवलेले बोलता येत नाही. मी आरपार हादरुन गेलोय वर्षभरातच होत्याच नव्हतं झालेय.’’
मी नरेश, माझे नाव पुर्ण सांगून काय उपयोग? मी काही तूमच्या कहाणीचा विषय नाही. की चारीत्रवान नायक नाही. पण तरीही बोलतोय. खर खरं सांगण्याचा प्रयत्न करतोय.
     कोर्टकचेरी, राजकारण सर्व काही मी कोळून पिआयलोय, मला आठवतेय मला पहीली जेल वयाच्या विसाव्या वष्र्ाीची झाली. त्यावेळी काहीतरी मारामारी केली होती. आठवत नाही पण तेव्हा अंगात रग होती. आणि राजकारणात विचारांची लढायची असते, असे शिकवायला कूणी नव्हते. ज्यांनी जामीनावर बाहेर काढले त्यांच्याच भजनी लागलो आणि त्यांचेच झिजवले. त्यांचीच पतपेढीतून पैसे उचलले. त्यांनी हातखर्चासाठी बर्‍याच वेळा पैसे दिले. पोरांना संभाळायचे म्हणजे  ही इन्वेसमेंट त्यांना मान्यच होती.
     निवडणूकीला अनेकांची डोकी माझे हातून फूटली होती.शाळा कॉलेजात राज्यपातळीवर खेळात चमकणारा मी रस्त्यावर छाती पूढे काढून चालू लागलो. दुकानदार घाबरले. मग मंडळे स्थापन केली. पावत्या फाडून हमखास वर्गणी जमवणारा आमदारांचा खास माणुस झालो. माझा वापर होतोय हे कळेपर्यत मला छाती काढून चालायाचे आणि छान शौकीत रहाण्याचे व्यसन लागले होते.
मला भार्इ ही उपाधी कधी लागली ते मलाच कळलेच नाही. पण ती नशा काही पौर होती. आलेल्या पैशांना पाय फूटत होते आणि गेलेल्या पैशांतून मित्र जमत होते. निवडणुका लागल्या की, मुंबर्इ, कोल्हापूर येथून प्रचारासाठी गाडया यायच्या त्यांची व्यवस्था माझ्याकडे असायची त्यामुळे राज्यभर दोस्ती झाली. माझा ही गरजेचा व्यवसाय बहरत होता. या दोस्तीनेच मला चोर बनवले. कूणाच्या कार्बोरेटतर , कूणाची बॅटरी काढ, पेटो्रल काढ असे एकएक उदयोग वाढत होते. त्यात मला मोटार सायकल चोरीचे तंत्र मिळाले पण मी कधी संपूर्ण मोटार सायकल विकली नाही. आम्ही त्यातील पार्ट काढुन मुंबर्इत नाहीतर गुजराथला विकायचो.
या व्यवसायात प्रगती झाली. मला आता या नवीन जगातपण स्वत:ची अशी ओळख मिळाली होती. मला पैसे उडवायची सवय लागली होती.  मी माझे जाळे पसरले. गाडया चोरुन त्या खेालून त्याचे सांगाडे जोडुन,खाडीत बूडवले. एक मिक्स बिंग फूटले माझी खानगी जेल मध्ये झाली. गावातून धींड निघाली आता मी विदयापिठात दाखल झालो होतेा. तेथेच मोठा गुन्हेगार बनणार होतो. मी एक अभ्यास केला. खूप विचार केला मला राजाश्रय होता. मी माझे गुडवील वापरायचे ठरवले. मी माझी गरज ओळखली त्यापेक्षा माझी गरज कूणाला कशी आहे त्यांचे ठोकताळे बांधले. बाहेर आल्यावर मुंबर्इत हातपाय पसरले. जीवाची मुंबर्इ केली. माझे सारखे गुणी माणसाची पारख करणारे बरेच जग मुंबर्इत होते. मी ही सावधपणे माझी मार्केट व्हल्यू वाढवत होतो. तीकडे राजकारणात मी काहीना नकोसा वाटत  होतो. पेपरमध्ये माझे फोटो आल्याने त्यांच्या गाडीचा सारथी बनवायला माझे राजकीय गुरु तयार नव्हते. मी माझे रंग दाखवायला सुरवात केली. ठिणगीचा वणवा पेटला. माझे गॅरेज त्यात जळून राख झाली.
     मी मार्ग बदलला ती काळाची गरज होती. तेव्हा पयंत उभी फालणी झाली होती. मला आठवतेय मला भार्इ म्हणणार्‍यांना माझ्याकडून  काहीतरी पाहीजे होते. मी आता पक्का बेरकी झालो होतो.माझा सफारी आता स्वच्छ सफेद झाला होता. हातात ट्रीपलफाय सिगारेटचे पाकीट, उंची लायटर ही माझी ओळख झाली होती. मी स्वत:ला गर्दीपासून वेगळा ठरवत होतो. ज्याला जे आवडेल ते पूरवायचा सपाटा मी लावला मला धंदयाचे अचूक गणीत समजले होते. अनेकांचे कान खाजवून मी माझे डाव साधत होतो. माझे राजकारण बेरजेचे होते. विरोधकानाही मिंधे करुन ठेवण्याची कला मला लाभली होती. ज्या गावातून विस वर्षापूर्वी धिंड निघाली होती, त्याच शहरात मी मंत्र्याच्या मांडीला मांडी लावून बसत होतो. माझ्याकडे बंगला होता, गाडया होत्या.
     सर्व काही होते. मोठी मोठी कामे मंजूर करुन आणायचा मी सपाटाच लावला. नेत्यांनाही विश्वासू एंजट पाहीजेच होता. मी माझ्या पोझिशनचा पूरेपूर उपयोग करुन घेत होतो. मुंबर्इ ,पूणे, नाशिक येथले गेम मी वाजवून देत होतो. माझा विश्वास सरकार दरबारी वाढत होता. मी श्रींमत होतोय ते त्यांनाही कळत होते. पण त्यांना त्यांची किंमत मी बिनभोबाट पणे भरत होतो. मी सरकारी इमारती बांधल्या अक्षरश: पैशाचा धुर काढला.
लक्ष्मी चंचल असते. घरातील लक्ष्मी मला अनेक वेळा भानावर आणायची. पण आता घरात थांबायला वेळ कूणाला असणार? मला सोबत घेवून जाणारे अनेक जण तयार होते. माझे मार्केट जोरात होते. अचानक नागपूरला असताना मूलाचे अपघाताचा फोन आला. कोमात गेला. लाखो रुपये खर्च केले दोन वर्ष त्यात गेली. तो हळू हळू सूधारत होता. मी तेव्हाच भानावर यायला पाहीजे होते. पण रोजची संध्याकाळ विदेशी मदयाच्या संगतीत जात होती. आता कमी धावपळीत ‘‘शान ‘‘ से जगायची आणि मांडवली करायची मला ओढ लागली होती.
      एका भल्या पहाटे मलाच अर्धांग वायूचा झटका आला. पून्हा मोठे मोठे डॉक्टर झाले. गंगाजल आटू लागली बॅन्कवाले माझ्यावर शंका घेऊ लागले. त्यांनी हात आखडता घेतला अनेकांची थकलेली बिले वसूल करुन देणारा मी माझा माझीच कामांची बिले दोषपूर्ण ठरु लागली होती. ती मंडळी आता माझ्या माणसांना वटण्यांचा अक्षदा लावत होते. डॉक्टरांनी जीवदान दिले पण नियतीनी डाव उलटवला घेतले. मला धडसलग बोलतापण येत नव्हते. मीच पक्षात दुर्लक्षीत झालो होतो. माझ्या नाकावर टिच्यून कालची पोरे पूढे जात होती, गाडया घोडे अुडवीत होती. मोठे मोठे समारंभ आयोजीत करत होती.
आता माझ्या घराबाहेर सकाळी जमणारी चपलांची गर्दी कमी झालेय. ज्यांचे मी काम केले अशी डझनावर माणसे येथे आहेत. पण ती मी समोर दिसलो की वाट बदलून जातात. पक्षाचा म्हणून मी कधीतरी एखादया कार्यक्रमात जातो. पण ते दुर्लक्षीले जीणे मला नकोसे होते. मित्रही आता नजर चूकवीतात. जे विरोधक आशेने माझ्याकडे जमायचे तेही सहीनभूतीचे चार शब्द फेकून काढता पाय घेतात. मागील नगरपालीका निवडणूकीत माझ्या माणसांना खडयासारखे बाजूला सारले गेले. कारण त्यांचे मी काहीच वाकडे करु शकत नव्हतो.
मी तरी वेगळे काय केले होते? ऐन उमेदीत अनेकांचे संसार मी उध्वस्त केले होते. अनेक सरकारी अधिकार्‍यांना माडी दाखवली होती. पैशाच्या नशेत अनेक कार्यकत्र्याना दाबले होते. नेत्यांचा उपमर्द केला होता. प्रत्येक तत्वे गुंडाळून ठेवली होती. त्या नशेत मीच माझी वाट हरवून बसलो होतो.आजच्या या परिस्थीतीला मीच कारणीभ्ूात होतो. नियती माझ्याकडे बघून खदा खदा हसत होती. माझ्या रिकाम्या वेळेच्या पोकळीत विषाचे प्याले ओतीत होती. माझा मी पोखरला जात होतो. वाळवी माझ्या वारुळालाच लागली होती. येणारा जाणारा माझे ते मातीचे वारुळ तुडवत होता. मी जीव वाचवत त्यात अडकून पडलो होतो.
     थरथरल्या हातानी त्यावेळी मिळालेली मानपत्रे हाताळत होतो. त्यावर धुळ जमली होती. सगळी निर्जीव कचकडयाची नाहीतर पत्र्याची होती. त्यातील अक्षरे मला वेडावून दाखवीत होती. कपाटातल्या शाली म्हातारपणी गोधडीनाही उपयोगी येणार नव्हत्या. म्हातरपण पहायचे नशीबात आहे की, नाही याचीच तर आता मला शंका येत होती. टेबलावर साचल्या होत्या त्या मोठया मोठया हॉस्पीटलच्या फार्इली आणि रिपोर्टस
मी स्वत: स्वत:चे पाय खेचत नेत होतो.
मी स्वत: स्वत:च्या कर्माने जेष्ठ नेता बनलो होतो.
ते सर्व शाप माझ्या भोवती पिंगा घालत होते.
माझे गनवैभव कूणाला लक्षात घेण्याचे कारण नव्हते.
कधीतरी एकांत खायला उठतो.
मी दार लावून स्वत:लाच जाब विचारतो
माझी सर्व पहीली गोष्ट आठवतो.
पहिली सिगारेट, मला वेडावून दाखवते
पहिली चोरी,
पहिली चारचाकी
पहिली मारामारी
पहिली जेल
     खूप उशिर झालेला असतो.
     हळूच कपाट उघडतो
     साल्या सर्व बाटल्याही संपलेलया असतात आणि आशाही....    





               

No comments:

Post a Comment