अडगळीची खोली
सगळीकडे पसारा !
हा आवरणार कोण ?
आणि कशासाठी ?
ही अंधारी खोली.
मनाचा ठाव घेणारी,
अडगळीतल्या आठवणी साठवणारी,
ही कॅनव्हास बोर्टवरची शार्इ,
कधीही न पूसता येणारी,
पुसायला गेले तर आणखी पसरणारी.
पूर्या चित्राची वाट लावणारी.
मला म्हणुन तर काळा रंग आवडतो,
एकतर उठाव देतो तुमचे कल्पनेला,
नाहीतर चित्रांचाच बेरंग होतो,
‘इसपार या उसपार ‘
मध्ये तारतम्य नाही की,
तडजोडही नाही.
हा ब्रश माझ्या आवडीचा
जीवापार जपलेला,
कलादालनात वापरलेला.
फटकारे मारलेला
त्यातून किती अजब नमुने साकारले
हा खरा तर माझा ‘सखा’
माझ्या पहील्या कमार्इतला,
पहीला ब्रश..
त्याचा तो चपटा स्पर्ष
चित्राला बॉर्डर काढणारा.
चित्राला चौकटीत टाकणारा.
ही चौकटच महत्वाची असते,
नाहीतर चित्र अपूर्ण वाटतं ,
अपूरे बनते, धूसर दिसते.
याला पुर्णत्वच येत नाही.
‘माझ्या सारखे.....
मी ‘गोल्ड मेडल’ मिळवले.
दूसर्या वर्षात असेन बहूदा,
किती भरुन आले होते तेव्हा,
वाटले मी नाव कमवणार.
माझ्या आकांक्षा सिध्द होणार,
कल्पनेला पंख फुटणार,
फूटणार होत माझे नशीब.
त्याचे कुठे अंदाज बघता येतात?
ब््राश हातात होता...
त्या जोशी भविष्यवाल्याचं भिंग
थोडच होते माझे हातात?
घरात भांडण करुन हौस भागवीली
स्वत:च्या मेहनतीने कलादालनात आले
नाव कमवायची नशा होती.
नशा तर डोक्यात होती,
काय करायचे तेच ठरत नव्हते.
व्यक्तीचित्रे, रेखाचित्रे, की शिल्पकला.
जायचे कुठे तेच माहित नव्हते.
पतंगाचा दोर तर कापलेला होता.
ब््राश हातात घेतला
थरथरत्या हाताला तो पेलवत ही नव्हता
मनगटात जोर नव्हता
पहीलेच प्रदर्शन...
लोकांनी भरभरुन अभिप्राय दिले.
कॉलेजच्या प्राध्यापकांनी सुचना केल्या.
पण पेन्टींग्ज भिंतिवरच राहीली.
ती निर्जीव होती, पण त्यातल्या रेषा बोलत्या होत्या.
अभिप्राय बोलके होते.
पण त्यात सहानभूती होती
अशिर्वाद भरपूर हीेते पण सर्व निर्जीव होते.
हॉलचे बील, रंगाचे बिल,
गोळाबेरीज केली, प्रकरण तोटयात गेले..
होती नव्हती ती उमेद गमावून बसले
चेहर्यावर हासू होते, गालावर मात्र आसू होते.
शेवटी व्हायचे तेच झाले.
वेष बदलला ---
देश बदलला --
‘कलाकार ‘ नवरा पाहीला
पाहीला म्हणजे दाखवला गेला.
घरच्यांनी ठरवले, मी ‘हो’ म्हटले
शेवटी जगतो ते आशेवर...
मनाच्या पटलावर चित्रं रंगवले.
निसर्ग चित्रांची मला फार हौस.
उडणारा बगळा ही माझी ‘सार्इन’.
चित्रात कूठेतरी ती डोकावयाचीच.
तोच माझा ‘ आशावाद’ होता, तोच माझा’आधार’ होता.
घराणे मोठे होते..
मन मात्र खात होते
मी रंगवत होते ‘स्वप्नं’ माझी
त्याच्यावर रंग होत ते माझे
विविध कटांनी ते भरले होते
त्यात होती नाना रंगाची फूले
उधलण होती रंगाची ती.
घर सासरचे ‘मोठ’े होते
घराणे नावाजलेले होते.
सासूनी विचारले ‘‘काय येते?’’
मी बोलले स्केचिंगची आवड आहे.
सासूबार्इ म्हणाल्या, ‘ते ठिक आहे गं ,पण काय येते?
माझ्या ‘ढबूला’ चांगले खायला आवडते
त्याचे जिभेचे चोचले पुरवणार ना ?
मानेने फक्त हो म्हटले
त्या दिवसापासून मी रांगोळी काढली
माझ्या संसाराची
ठिपक्यांची रांगोळी ..
संस्कार भारतीची ‘रांगोळी’
पण त्यात रंग भरायचे विसरले,
कसे भरणार?
संसार कुठे भरलेला होता?
ते हात रिक्तच होते
एकदा जरी म्हणाला असता ‘ढबु’’
हळूवार कॅनव्हास सजला असता
घर ‘मोठ’े होते.
दिवाणखान्यात सगळे होते.
माझे स्टॅण्ड मात्र, अडगळीच्या खोलीत
पडले होते ते मनाच्या खोल गुहेत
अंधार्या खोलीत,
तिथे ज्यांनी पणती लावायची
तो ‘ढबु’ संपादक होता
जगाला अग्रलेखातुन अकल्ला शिकवायचा
काळचा दिवस बरा होता,
रोजचा आज त्याला आशावादी बायकोला तो आज दाखवायचाच नाही.
जगात काय वार्इट तेच शोधणारा
तो मीडीस होता,
हजार रोगांवर ‘रामबाण’ इलाज होता,
घरातल्या रोग्यांना मात्र तो पण उपयोगी नव्हता,
मी खरच आजारी होते
मला कूढण्याचा रोग जडला होता
रोज मी कुरडतडत होते
माझ्या आयूष्याचे स्वप्नच उसवत होते
घरात सर्व काही होते
पण अडजेष्टमेंट मला कळत नव्हती
नवरा नावाचे पात्र होते
ज्याला स्वताचेच करीअर पडले होते.
लग्नाआधी का नाही बोललीस?
एकदा त्यांनी विचारले..
तेव्हा मी कडाक्याचे भांडण काढले,
माझा कोंडलेला ‘श्वास’ मोकळा केला.
त्याने चक्क ‘नाही’ सांगितले...
पैसा प्रदर्शनात उधळायला नाही सांगितले
फारतर मी घरात बसून चित्रं काढ म्हणाला
पण माझा इगो आड आला..
आज त्यालाही ‘वीस’ वर्ष झाली..
दोन पोरांना संभाळता संभाळता
रंगातली छटाच उडून गेली.. घराणे आमचे मोठे होते
सोनेरी पिंजर्यात पक्षी वाढले होते,
दाणा पाण्याचा तोटा नव्हता.
पण अंगण्यात मोकळा झोपाळा नव्हता.
फॅल्टमध्ये सेन्ट्रलाइज्ड एसी होता,
पण ती माडाखालची सावली नव्हती.
गावची आमरार्इ नव्हती,
म्हणायला मुरबाडला एक ‘फार्म हाऊस’ होते
पण त्यात नव्हती चंद्रमोळीची मौज.
नोकराचीच तिथे मक्तेदारी होती
खूप प्रयत्न केला जुळवुन घेण्याचा
स्वत:चे चित्र स्वत: रंगवायचा,
पण हात थरथरत होते.
हे चित्र एकटयाने कसे रंगवणार?
हे तर ‘समुह गाणं’
ज्यात ताळमेल नव्हता
दोघांच्या वाटा वेगळया होत्या.
नजरा वेगळया होत्या. कळले तेव्हा उशीर झाला होता
तडजोडीशिवाय आता पर्याय नव्हता.
माहेरची रंगपेटी बंद झाली होती..
सासरची अडगळीत पडली होती.
आज त्यांना कसलेतरी ‘पारीतोषिक’ मिळाले
मी चक्क नाही म्हटले
सर्वजण नटून सजुन गेले
मी आजारपणाचे सोंग घेतले
माजघरातून देवखोलीत आले
निंरजनाची वात मंद तेवत होती
मला काहीतरी ती सांगत होती.
हया मनीचे त्या मनीला कळले..
आपल्या नशीबी फक्त जळणेच आले.
तरी मंद तेवणे संपले नव्हते
चटका देऊन राग कधी दाखवला नाही
जळत राहून शांतीच दिली..
‘त्या’ ज्योतीने सारे काही शिकवले.
मी देवाचे आभार मानले
जड पावलाने अडगळीत गेले
कॅनव्हास होता
बोर्ड तूटका पडला होता
कोनाडयात ब्रश मात्र सुकला होता. थोडावेळ हेलावले. डोळे माझे पाणावले.
मन शांत झालयावर, वीस वर्षानी पुन्हा एकदा
स्वत:ला सावरले
आजपासून नवा ‘पाडवा’ करु
जीवंताची आसक्ती स्वत: करु
रोज रोज मरण्यापेक्षा
एकदा तरी मानाने जगू
आज मी बंडाचा झेंडा उभारला
छान छान इतके वाटले
पहीला कागद रंगवला
पून्हा एकदा ‘जीवन’ रंगवले
चित्र उमटले
वेडे वाकडे
त्यात रंग भरले
चित्रातला अर्थ शोधायचाच कशाला?
विस वर्षे तर असे निरर्थक फटकारे चारले होते
त्यांना कुठे मतलब होता?
त्यात कूठे हिशेब होता?
हिशेब करायला येथे कूठला जमाखर्च होता
हा तर माझा कॅनव्हास होता.
स्वत:च रंग भरण्याचा
पहीलं चित्र मानवी मनाचा गुंता होता.
त्या कागदावर ‘‘ भोवरा’’ साकारला होता.
मानवी मनाचा कल्लोळ त्यात माजला होता.
त्यात माझा अभिमान डोकावत होता
त्या गुंत्यात हरवला होता तो,
मझा उडणारा पक्षी
तो तर केव्हाच उडाला होता,
त्याला कसे पकडणार?
ब््राश माझ्याकडे बघून हसत होता,
त्याला माझे दूख: कळत होते,
मी पून्हा ब्रश उचलला,
डोळे मिटले,
नवीन कागद घेतला,
एक सूंदर तळे उमटले.
तळयाकाठी गूलमोहर
पाण्यात उमटले तवंग
काठावर देवळात जाणारी पाठमीरी मी,
उचलेले एक पाऊल
तो सुटलेला आंबाडा,
चित्रातले देऊळ मला खूणावत होते.
देवळातला देव मला वेडावत होता.
मनातला ‘इगो’ मला न्याहाळत होता.
पाठमोरी मी भेदरलेली नव्हते
भक्तीभावाने मी पायर्या चढत होते.
देवपूजेची वेळ झाली होती.
हळूच तो उडणारा पक्षी परत आला
अलगद कागदावर उमटला,
माडाच्या झावळयांतून तो,
पंख पसरुन विहारत होता.
माझ्याकडे बघून सूखावत होता.
मला माझे देऊळ सापडले होते.
मलाच माझे अस्तीत्व सापडले होते.
जे मी शोधत होते.
ते इतके दिवस
अडगळीत,पडले होते.......
मनातला पक्षी,
पिंजर्यात होता.
पिंजर्यातला पक्षी
कागदावर उमटला
एका निसटच्या क्षणी,
ते गवसला होता.
No comments:
Post a Comment