घोट घोट नशा
‘‘ ए सुवर्णा कशी आहेस?’’
‘‘ तू कशी आहेस ?’’
‘‘ छान !
‘‘ मी पण छान’’
त्या दोघी एका लग्न समारंभात भेटतात. पहिल्या रांगेतल्या सर्व गोतावल्याचे लक्ष खेचून घेतात. संवाद तर नेहमीचाच पण दोघींची भेट अदभूत अगदी जिव्हाळयाची.
त्या दोघी सख्या चूलत बहीणी पण चार वर्षात विशेष भेट नाही. नाहीतर माहेरच्या कोणत्या कार्यक्रमात दोघी नाचल्या नाहीत असे कधी घडलेच नाही. दोघींची जोडी उभ्या खानदानात फेमस फरक एकच. सुवर्णा नावाप्रमाणेच सवर्ण कन्या होती. लाखांतही उठून दिसेल अशी नाजुक सोनकळी, सदा हसरी आजूबाजूच्या अवघा परीघ आपलासा करणारी. मुंबर्इत वावरलेली नाजूक नार नटखट, अवखळ अगदी खळाळून हसणारी.
आज लग्न लागल्यावर सूवर्णा आली ती आपल्या आर्इ सोबतच. अगदी साधी वेशभूषा कोणतीही फॅशन नाही की लीपस्टीक नाही. मोठेपणा आणि दिखावूपणा उदंड वाहून चाललेल्या गर्दीत सूवर्णा एकदम वेगळी भासत होती. साध्या साडीतील ती हसून खिदळूून बोलत होती, वावरत होती. पण जाणकारांच्या नजरेतून ते वेगळेपण सूटत नव्हते.
‘‘ मावशी, सुवर्णा आलेय बघीतलीस ?काय फाटलेय का ?’’
‘‘ नाही माहीत, कानावर तर नाही ‘‘
‘‘ मग इतकी साधी ?’’
‘‘ नोकरीवरुन डायरेक्ट आली असेल’’
‘‘ ती आणि नोकरी शक्यच नाही.’’
‘‘ थांब, कळेल आपोआप ‘‘
हे लग्नातल्या हॉलमधले कुजबूजणं, त्याला अंत नसतो. विषयांना कमी नसते. दोन बायका जमल्या की नजरा भिरभीरायला लागल्याच समजावे. आपली पोर काय करते ते नाही पहाणार पण दूसर्याच्या सूनेने केस मोकळे सोडले तरी यांना हजार प्रश्न पडणार. इथे तर दोन वर्षापूर्वी सर्वाचे आकर्षण असलेली सुवर्णा दहा वर्षानी म्हातारी असल्यासारखी दमून भागून आणि तेही साध्या वेशात आलेली होती. म्हणूनतर आज ती चर्चेचे कारण ठरली होती.
सूवर्णा आणि अपर्णा जवळच्या मैत्रिणी साधारण एकाच वयाच्या सख्या चूलत बहीणी एका समारंभात एकत्र आल्या आणि बोलता बोलता दोन सख्या भावांच्या प्रेमात पडल्या. जावा जावा बनल्या. अगदी दृष्ट लागले अशा जोडया!
सुवर्णा मुंबर्इत वाढलेली बाबांचा नाजूकपणा आणि गोरेपणा घेऊनच आलेली गावच्या वातावरणात सुÍी घालवता घालवता चूणचूणीत इंग्रजी माध्यमात शिकलेल्या तन्मयच्या प्रेमात पडली. काही समजायच्या आत घरच्यांनी या नात्याला मान्य करुन टाकले. साखरपूडाच उरकून टाकला. मूलगाही शिकलेला समाजात मात्र सदमान असलेला घरातला रोजच्या पहाण्यातला मुंबर्इत धावपळ करणारा. अपर्णाही कशी मागे रहाणार? तीला पून्हा कारूण्याची झालर बापाने टाकलेली पोर ऐन उमेदीत बापानी संसारावर लाथ मारली. अवदसा आठवल्या गत एका सटवीचे मागे धावत गेला. आयूष्यभर असलेली साथ सोडून मागचा पूढचा विचार न करता गावभवानीचे जोडे पूसू लागला.
अपर्णा जेमतेम दहावीत असावी. घरातील रोजची भांडणे कानी पडायची. शेजारी पाजारी हसायचे मान खाली घालून दोन वेण्या पाठीवर टाकून अपर्णा शाळेत जायची बेल झाली तरी घरी परतू नये असेच तिला वाटायचे सोन्यासारखी नोकरी सोडून बाबा घरात बसलेले दारु पीत असते तर बरे झाले असते अशा भावनेत आर्इ दिवस काढायची. माहेरचे घरात आश्रीतासारखे जीवन नकोसे झालेले. शेवटी प्रकरण कोर्ट कचेरीत गेले. पोलिस स्टेशनला इज्जतीचा पचंनामा झाला. अपर्णा अशा परिस्थीत वाढत होती. लाडाने खेळवणारे बाबा तिला पारखे झाले होते ती प्रयत्न करीत होती पण अपर्णाच्या नशीबी प्रत्येक वेळी हारच येत होती.
चूणचूणीतपणा हूशारी अपर्णाकडे होतीच. घरच्या दूखा:वर पांघरुण घालण्यासाठी अपर्णा शक्य तितका वेळ मिळेल त्या स्पर्धेत भाग घेऊन घालवायची. आजुबाजूला रमायची, शेवटी स्वत:चेच घर तिला परके वाटू लागले.एक दिवस बाबांनी घर सोडले. आर्इ निष्टूर झाली होती. बाबांच्या वागण्याला कंटाळळी होती. ती गाव भवानी नवर्याच्या मागे ठामपणे उभी होती. श्शेवटी रूद्र अवतार दाखवणारी आर्इच विरघळली घटस्पोट देऊन मोकळी झाली. त्या दिवसापासून बाबांचे नाव पोरीने टाकले. चूलत बहिणी सोबत हसता बागडता तीची जाऊबार्इ म्हणून तिच्याच घरात अपर्णानी प्रवेश केला.
आज पंधरा वर्षाचा मूक इतिहास डोळयात साठवून त्या भेटत होत्या. एकीचा बाप हरवला होता आणि दूसरीचा नवरा आजूबाजूला असून अनोळखी झाला होता. परका वाटत होता.
दूसरी सुवर्णा दहा बारा वर्षे रडत संसार केला. रूपवान नवरा महत्वाकांक्षेत भरडला जात होता. स्वप्नांच्या मायाजाळात फसत चालला होता. ऐतखाऊ बनत होता. सासर्यांच्या जीवावर उडया मारत होता. एकलूता एक जावयाचे गोडकौतूक करताना जावर्इ हातचा कधी गेला तेच आर्इबाबांना कळले नाही. जावयाकडे लक्ष्मीसारखी बायको होती. पण त्यांनी बाटलीला कवटाळले. तो हात घालेल त्या धंदयात अपयश आले. मेहनतीपेक्षा झटपट पैशाची हौस अंगाशी आली. सासरे निवृत्तीनंतर घरी बसले त्याबरोबर जावयाची गाडीही व्यसनात रूतली. हताश होऊन तो गावी परतला दारु सोडेन सोडेन म्हणताना पून्हा पार्टीत दिसु लागला. राजबिंडा जोडा दृष्ट लागल्यासारखा वाटू लागलाश्शेवटी जीवावर उदार होऊन निर्णय घेतला नवर्याला चोख बाहेर काढून घराची दारे बंद करुन घेतली. स्वत:चे विश्व तीने बनवायचे मनावर घेतले. आर्इ आणि पोराची जबाबदारी स्वत:चे नाजूक खांदयावर घेतली. शान शौकीपणा सोडून नोकरीला लागली. नवरा असून त्याला शिक्षा सूनावून मोकळी झाली. त्याला त्याचा मार्ग मोकळा करुन दिला.
आज लग्नातही साधेपणाने तीच गर्दीचे आकर्षण बनली होती. तीचा तो ‘ कोपर्यात नजर चुकवत गर्दी टाळत इकडे तिकडे वावरत होता. ‘‘ अपर्णा कशी आहेस, मला वाटले नव्हते’’तू भेटशील’’
‘‘ सुवर्णा मला तर तू येशील असेच वाटले नव्हते.’’
‘‘ सुवर्णा तू तर मानाने जगायला पाहीजेस, तू तूझा पायावर उभी आहेस.’
‘‘ अपर्णा चल बाजूला बसूया ही गर्दी आता नकोशी वाटतेय. नजरेतला आपलेपणा अंगाला टोचतोय.’’
‘‘ सुवर्णा, खरे आहे. माझी आर्इही अशीच हरवलेय.काळाने तिला सावरले तरीही ती समाजात वावरायला तयार नाही.’’
‘‘ अपर्णा या जगात प्रत्येकाची वेगळी नियती ठरलेली असते. दोन सख्खे भाऊ कुठे सारखे नशीब घेऊन येतात ? त्यांच्यात फक्त ते ‘डीएनए’ सारखे पण मनाचे, वृत्तीचे ‘डी एन ए’ कुठे सारखे बनलेत? नाहीतर अपर्णा आणि काका असे वागले नसते.
‘‘ स्ुावर्णा खंर आहे, आपले नशीब घेऊनच आपण जन्माला येतो. आपल्याला वाटते निर्णय घेणे आपल्या हातात असते. पण आपण हतबल असतो. नियतीच तर नाचवत असते आपल्याला’’.
‘‘ अपर्णा मी त्या नियतीच्याच शोधात आहे जिथे भेटले तिथेच तिला थोबाडीन पांगळी करणारी क्रुर खलनार्इकाच ती. मी नाही ते घडू देणार. मी असा भूतकाळ विसरलेलीच आहे. माझा उदया काय असेल ते मला माहित नाही पण अपर्णा उदयाचा काळ मी घडवलेले असेल त्यावर फक्त माझेच कोरीव काम असेल आम्हावर माझे संस्कार असतील. तो माझी वणवण पहातोय उदया त्याचाच असेल.
सूवर्णा पण तन्मय ! त्याचा पूर्नविचार?
कशाला आणि का ? बाबाचे नाव लावायला पोरगा आहे. मी त्या दोघांच्यात आलेली नाही. आल्हाद मोठा झाल्यावर डोळसपणे निर्णय घेर्इल.
आणि तन्मय परत आला तर ?
नाही येणार! मला खात्री आहे. आज पचनताप करायला पण मोठं काळीज लागतं. व्यसनानी अपराधीपणा येतो. त्यातून बाहेर पडल्यावर त्याला आजपर्यंत नाही वाटलं यावसं तो नाही येणार.
आणि आला तर मला माझे दिर जाऊ माहित आहे सूवर्णा गेली दोन वर्षे तो तूला भेटण्यासाठी पाहतोय.
नाही मी दूर गेलेय, अपर्णा फार तर तो एका घरात राहील मनाची कवाडे बंद झालीत. मीही स्वत:ला दूसर्या विश्वात गुंतवून घेतलय ?’’
‘‘ काय सांगतेस सूवर्णा ?’’
‘‘होय, अपर्णा मी नाम किर्तनाचा मार्ग स्विकारलाय. किर्तनात बसता बसता अपर्णा मीच मिरामय झालेय. विरहाचा खरा अर्थ मला आता कुठे उमगलाच.’’
‘‘आणि तन्मय ?’’
‘‘अपर्णा त्या सर्वापलीकडे मी गेलेय. संसारात राहूनही मी चक्क विरक्त झालेय. दोर कापलेत ते समजून उमजून... ‘‘
आर्इबाबांना माहीत आहे ? हे? त्यांना चालते हे सर्व ? आम्हाला कसे अजूनपर्यत कळले नाही ?’’
‘‘ नाही आर्इची जबाबदारी मीच घेतलय. मी काही सफेद कपडे घालत नाही. िटेळे आणि गंडे मोठे जाळत नाही. जगात मी वावरते पण तरीही याजगात मी एकटी आहे हे मी ठरवलेय. अल्हाद मोठा होतोय. त्याला अजूनही परिस्थितीचे चटके लागू दिले नाहीत. स्वत: नोकरी करेन. त्याला काही कमी पडू देणार नाही ‘‘
‘‘अपर्णा तूझी आर्इ ?’’ असते तीही नाम किर्तनात. तिने संसाराच धसकाचं घेतलाय. नवरा परत येर्इल म्हणून रात्री दरवाजाला कडी लावत नाही. मंगळसूत्र काढत नाही. कुणाच्याही सांगण्यावर तिचा विश्वास नाही. कपाळाच्या कुंकवाची ताकद तीला सर्व माफ करायला लावते. तासन तास देवापूढे गार्हणं गात बसते. कधी तरी एकटक गेटकडे नजर लावून रडत नजर. तिच्याच आठवणीत ती हरवते. स्वत:लाच दोष देते. नवर्याला सोडायला नको होते म्हणून हळहळते, नामस्मरणासाठी बैठकीत बसते, दासबोध वाचते. तीचा देवच गुंतलेली असते. सूवर्णा तिने साठी गाठलेय तूझी अजून चाळीसी यायची आहे. मला तूझी खूप काळजी वाटतेय गं !’’
‘‘घाबरु नको अपर्णा, हे दोन पिढीतंल अंतर आहे. माझ्यावर तूझा विश्वास आहे ना? आणि मावशीचा तिच्या नशीबावर विश्वास इताच त्यात फरक आहे.’’
‘‘ स्ुावर्णा खरं आहे. पण तरीही तू असं लार्इफ फुकूंन टाकायला नको हवं होतंस, असं वाटतेय.’’
‘‘ अगं हे जाळणं, जळणं,फूकंण हे सर्व आभास आपणच आपल्या मनासाठी केलेले असतात. हे सर्व डोंबार्याचे खेळ. त्यात जीव नाही गुतंत माझा आता तू पहाशील मी तरेन यातून. आज माझ्या मनात कुणाबद्दल राग नाही. अगदी नवर्याबद्दल सूध्दा नाही.
‘‘ तन्मय चूकला त्याली मी सूधारण्याची संधी दिली,भरभरुन प्रेम दिलं तरीही त्याला नाही स्वत:ला सावरता आले नाही. त्याची नाव ओढत किनार्याला आणताना मी आता जीव धोक्यात घालवायला तयार नाही. हे कष्टाने स्विकारलेले आचरण सोडायाला तयार नाही. अगं हया एकटेपणाचीही एक नशा असते. तो कदाचीत त्या नशेतून बाहेरही येर्इल पण मला या नशेतून बाहेरच यावेसे वाटत नाही...’’
No comments:
Post a Comment