अॅड. विलास नार्इक यांचा वकील संघटनेतर्फे सत्कार
अलिबाग
दिनांक:- 19डिसेंबर
अलिबाग तालूका वकील संघटनेतर्फे जेष्ठ वकील अॅड. विलास नार्इक यांचा सत्कार अॅड. श्री. दिगंबर राणे व अॅड. गौतम पाटील यांचे हस्ते दिनांक: 18 डिसेंबर रोजी वरसोली येथिल कवळे रिसॉर्टमध्ये आयोजीत केलेल्या विशेष कार्यक्रमात करण्यात आला.
श्शेतकरी कामगार पक्षाचे लिगल सेलने या समारंभाचे आयोजन केले होते. अॅड. सचिन जोशी व अॅड. संतोष म्हात्रे यांची याप्रसंगी समायोचीत भाषणे झाली. अॅड. गौतम पाटील यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणात अॅड. विलास नार्इक यांनी जिल्हा सरकारी वकील व विशेष सरकारी वकील तसेच भारत सरकारतर्फे केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा विशेष गौरव केला. अॅड.दत्ता पाटील स्मृती पूरस्कार व रायगड भूषण पूरस्काराने त्यांना एक साहित्यीक व सामाजीक भान ठेवणारा प्रतिथयश वकील म्हणून सन्मानीत करण्यात आल्याचे सांगीतले.
अॅड. सचिन जोशी यांनी अॅड. श्री विलास नार्इक यांचे साहित्य क्षेत्रातील कामगिरीचा व त्यांना मिळालेल्या राज्यस्थरीय साहित्य पूरस्कारांचा विशेष उल्लेख केला. अॅड. विलास नार्इक यांच्या ‘‘ एक ना धड ‘‘ या अनूभव कथासंग्रहास कै. राजा राजवाडे साहित्य पूरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य पूरस्कार व विदर्भ साहित्य संघाचा अंकूर साहित्य पूरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यांचे ‘कळत नकळत’ हे पूस्तकसुध्दा वाचक वर्गात प्रसिध्द झालेले आहे. आणखी एक पूस्तक ‘‘ जीवन सूगंध ‘‘ हे लवकरच प्रकाशीत होत आहे. 25 वर्षे वकीली व्यवसाय करणारे अॅड. विलास नार्इक यांनी अनेक सामाजीक उपक्रमात महत्वाची भूमीका बजावलेली आहे. अनेक महत्वाचे खटले त्यांनी यशस्वीपणे चालविले आहेत.
अलिबाग तालूका लीगल सेल तर्फे सत्कार केल्याने आपण विशेष आनंदी झालो असल्याची व घरातून कौतूक झाल्याबद्दलची कृतज्ञतेची भावना अॅड. विलास नार्इक यांनी या प्रसंगी व्यक्त केली.
अलिबाग तालूक्यातील अनेक वकील या सत्कार समांरभास आवर्जून उपस्थीत होते.
No comments:
Post a Comment