अनुसया
‘‘ अगो! ए ss अनुसया! ‘‘
‘‘ जरा बीगी - बिगी चालकी..’’
‘‘ सांजच्या वक्ताला गाठायचाय की वस्ती..’’
‘‘ राहु दे ,भवाने ठेव ते ओझं!’’
‘‘ इस्तु जाळायला फाटी पोचवायची हायत ‘‘
‘‘ चालकी बीगी बिगी !’’
डोक्यावरची भारी घेवुन स्वत:ला सावरूत काशीबार्इ अनुसयेला पुढे ढकलत होती.
आदीवासींच जिवन हे असचं....
डोक्यावर फाटी घेऊन भविष्याची काळजी नसणारी ही कोकणाच्या कर्या कपारीत दिसणारी कातकरी जमात कुठे जायचे त्याचा ठावठिकाणा नाही की विंवचनेच ओझं पाठीवर नाही. आणि ही मंडळी कमरेला कोयता, हातात रात्रीपूरतं जीन्नस आणि पोटात पावशेर टाकलेली बर्याचवेळा रस्त्याच्या कडेनी पाऊळवाट तूडवताना आपलयाला जोडी जोडीने आपल्याला अनेक वेळा दिसतात. वस्तीपासुन दुर सिद्धेश्वराच्या डाव्या अंगाला ती सागरगडाची माची दिसतेय ना? तीथे हयांची कातकरी वाडी...
म्हाåयांचा रघुदादा सरपंच झाला तेव्हा कुठे पहीला ‘ग्लोब’ यांचे वस्तीजवळ लागला नाहीतर स्वातंत्र मिळाल्यापासून दिवस मावळला की यांची दुनियाच संपायची. अजुन -अजुन पर्यंत चुलीवरच्या टेंब्याच काय तो कातोडी वाडीवर वस्तीत उजेड दयायचा.
रघुदादा चांगला दहा बारा वर्षे सरपंच राहीला, त्यांनी लार्इटचे पोल टाकले. नंतर कातकरीवाडीत लार्इट गेली तेव्हा कुठे वाडीवर उजेड पडला.
कातकरी वाडीचे नाव ‘रघुची वाडी’ पडले, कारणे पण तसेच मजेशीर, या आमच्या रघुदादानी माचीवर लार्इट आणली, वेताळाची पुजा घातली माचीवर पार पुर्वीपासुन इकडे तीकडे दगडी मूत्र्या पडलेल्या. काही आडव्या पडलेल्या, काही उभ्या पुरलेल्या त्या काळी देवाचा कोप नको म्हणून जपून ठेवलेल्या पण वाडीवर यांच काय?’’ म्हणुन रघुदादानी वस्तीला सवाल केला. वाडीचा नियम आडवा आला देव खेळवला. भगतानी आडकाठी घातली. पिरांचा कोप काढायला पाहिजे. वेताळाला रगत दाखवायला सांगितलं. रघुदादानी दोन बोकड देवावर साडले वाजत गाजत भगत खेळला. त्या रात्री वाडी झोपलीच नाही. मोहाच्या दारूनं देव धुतला ‘देवाचे अंगावर काय वाय लीवला होता.’’ खरं तर तो एक शिलालेख होता पण त्याला वेताळाचं नाव लागले होते.
मला अनुसया सांगत होती.
मी या आदीवासी वाडीची मंदातार्इ,
‘एनजीओ’. माझे काम आदीवासींना माणसांत आणण्याचे
मी ही वस्ती खूssप अनुभवली होती.
आदीवासींना जवळुन अभ्यासले होते .
त्यांची भाषा वेगळी,
त्यांच्या गरजा वेगळया,
त्यांना सुधारा सांगुन ते सुधारत नसतात
यापूर्वी माझ्या आधी निदान चारपाच तरी एन जी ओ चे प्रयत्न फुकट गेले होते.
नर्स आणि सिस्टर्सनी तर यांच्यापूढे हात टेकले होते.
सरकारी अधिकारी इकडे कधी फिरकत नव्हते.
त्यांना कौले दिली तर तीही विकुन ही मंडळी त्याची दारू पीतात.
मागे गांधी जयंतीला आमचे ‘‘उन्नती’’ संस्थेने सोलर लॅम्प बसवले ते पोरांनी तोडुन टाकले. नसत्या योजना देवुन यांना त्याचा काही फायदा नाही, हे मी नेमके ओळखलं
रघुदादाला हाताशी धरला,
आणि मग
रघु सरपंच पक्का बेरक्या,
पुरता राजकारणात मुरलेला,
त्याच्या घराबाहेर संरपंचपद कधीच गेलं नाही,
गाव फिरले तरी रघु जागेवरच चिकटून होता
रघुदादाची भिस्त या आदीवासी वाडीवर,
रात्री बेरात्री कोतोडी रघुदादाकडे यायचे.
इंचु चावला तरी रघुदादा.
रघुदादा माझं ‘माध्यम’ होतं, ते आदीवासी विकासाचं.
आमचं अंतर आम्हाला माहीत होतं.
रघुला हक्काचा मतं बांधुन पाहीजे होती.
मला मन जोडुन पाहीजे होती.
मी वस्तीवरच राहण्याचा निर्णय घेतला
माझाही संसाराचा ‘इस्फोट’ झाला होता. मला सासरच्यांनी ‘‘कातोडीच’’ ठरवले होते.
माझा नवरा आदर्श होता. पण वाडीवर यायला तो तयार नव्हता. तोही समाज सेवेतच होता. पण त्याची ‘‘आयडीओलॉजी’’ वेगळी होती. त्याची एनजीओ ची व्याख्या वेगळी होती. मला ‘‘आदीवासी मीत्र पुरस्कार’’ मिळाला पण तो घ्यायलाही मी गेले नाही....
‘‘दोघेही एकाच’’ स्कुल ऑफ थॉटचे पण दोघांच्या दिशा वेगळया. आमची मते जुळलीच नाहीत. त्यांनी वसर्इच्या मीशनरी संस्थेत काम करायचे ठरवले. त्याला धर्म सोडावासा वाटत होता. मी मात्र बाटायला तयार नव्हते. समाजसेवा करताना धर्माचा अडसर मला येत नव्हता. त्याचा मानवतावाद वेगळा होता. त्याला गीझरचे पाणी लागायचे, बेकरी प्रॉडक्ट लागायचे, रविवार आला की मंडळी डबे घेवुन आदीवासीं वस्तीकडे धावायचे. तीकडे गुजराथ सीमेवरही आदीवासी होतेच. पण त्या आदीवासींनी शहरे बघीतली होती त्यांच्या दारात विकासाची गंगा पोचवायची होती ‘‘ देवाची लेकरे’’ असे म्हणत त्यांना प्रार्थना बोलायला लावायचे मग लाच म्हणुन दान धर्म करायचे कपडे दयायचे, औषधे दयायचे.मला हेच पसंद नव्हते मला सेवेत तो धर्माचे विख पेरतोय असे वाटायचे. दोन तीन वर्षातच आम्ही वेगळे झालो मी मजल दरमजल करीत कोकण गाठले.
काम करण्यात जरा कमीच पडते मी सर्व संघटना सोडुन टाकल्या आता या वाडभ्वरच रहाते. रघुदादाच्रूा वाडयात. माचीवर हा बेडा बैलांसाठी होता. सघुदादाच्या बापानी गुरंढोरं विकुन टाकली वाडा तसाच पडुन होता. आदीवासी वाडीपासुन हाकेच्या अंतरावर होता. मी माझा परीघ ठरवुन घेतला.
आज मी कुणाची माय झाले, कुणाची बाय, नाहीतर आक्का झाले आहे. मी रघुदादाची ‘मध्यस्थी’ झाले होते. आदीवासी योजना राबवणारी ‘खमकी’ मंदातार्इ झाले.
अरे! मी माझेच पुराण सांगत सुटले की, होते असे कधी-कधी. मोकळ बोलायलाही मनं जुळायला लागतात. आम्हाला सकाळपासुन संध्याकाळपर्यत तसा काहीच उद्योग नसतो. आरोपांची शाल अंगावर घेवुनच आम्ही सतत वावरत असतो. कधी कधी तुमच्या शहरातली पोशाखी मंडळी येतात. कुणी काहीकाही कुजबुजतात, कुणी नवर्यानी टाकलेली ‘टवाळी’ बोलतं. कुणी नार्वेतुन पैसा आणणारी ‘धुर्त’ एनजीओ समजतं. कुणी रघुदादाची ‘रखेल’सूध्दा समजत.
माझे कान किटलेत आता हे सर्व ऐकुन माइयावर त्याचा काहीच परीणाम होत नाही. माझा ‘परीघ’ मी ठरवलाय. ती त्रिज्या मला ओलांडायची नाही. मला तुमच्या शहरांचाही उबग आलाय. त्यामुळे मला स्पर्धेची भीती नाही की कितांबांची हौस नाही निसर्ग मला भरभरून देतोय. अगदी पोटापुरतेच नाही, तर शिल्लक राहील इतक्या किंमतीच्या औषधी वनस्पती मी सप्लाय करते. आमच्या अनुसयेचा बचतगट मीच तयार केलाय. त्यांच्या बचत खात्यात पैसे शिल्लक आहेत. आमचे जंगलात औषधांना काही तोटा नाही. अनुसया हे माइया परीघातलं माझ खास पात्र. अनुसया वस्तीवर आली तेव्हा दुसर्या वस्तीतल्या तीच्या नवर्यानी तीला झोडपुन काढले होते. डोके फोडुन टाकले होते. दारूनी तिचा घात केला होता तीला तो दारुचे गुटयावर बेचन वर बसवत होता. एका हवालदाराच्या दारूचे धंदयावर दारू विकायला स्कतीने बसवत होता. अनुसयानी बंड पुकारले. स्वताचा संसार लाथाडला. हवालदारानी नवर्याला आधीच मींधे करून ठेवले होते. अनुसयानी बामणगावची ती ठाकूर वस्ती सोडली. मावशीकडे माचीवर आली, पूढे ती माझी ‘अॅायडॅाल’ बनली. मी तीला माझेकडे ठेवुन घेतली थोडी शिकवली. तीला माणसात आणली सूदैवाने माइया मनासारख्या घटना घडत गेल्या. रघुदादाच्या विटेच्या भट्टीवर शंकर होता. त्याची बोयको दोन वर्षापुर्वीच साप चावुन मेली होती. शंकरवर माझी करडी नजर होती. माझा तो हरकाम्या माणूस होता. रघुदादानी माझा शब्द ऐकत शंकरचा पाट अनूसयासोबत लावुन दिला. वाडीवर सुन आली. अंधश्रद्धा घालवायचा नुसता गप्पा मारून मला काहीच फायदा नव्हता. मी औषधांचा व्यापार उगाच नव्हता सुरु केला. माइया जडीबुटींनी हळुहळु वाडीवरचे अंगारे धुपारे कमी होत होते. रघूचे वाडीवर पाणी योजना आली. .मागच्या निवडणुकीत बोरवेल आली नंतर त्यावर पंप बसला चक्की आली. अनुसयेच्या पावलानी जणू माचीवर लक्ष्मी नांदायला आली. अनुसयेला आम्ही ग्रामपंचायतीत उभी केली. आदीवासी राखीव जागेवर रधुदादाची हक्काची सीट निवडुन आली. प्रथमच रुपया न वाटता आम्ही ग्रामपंचायतीत आमचा सरपंच बसवला. रघुदादाची नजर सरपंच पदावर होती. आदीवासी राखीव जागेवर माझी अनुसया सरपंच झाली. वाडीवर रघूदादानी फटाके फोडले. वाडीला शान आली. रघुदादानी राजकारण केले, त्याला तेच करायचे होते. मी अनुसयेला आधीच शहाणी करून ठेवली होती. एकजात आंगठा कुठे दयायचा नाही असे बजावून सांगितले होते. अनुसया झकास सही करायची, अनु वाघमारे ,सही खाली तारीखपण टाकायची. पण ती मला कागद दाखविल्याशिवाय कुठे सहीच करायची नाही. तीचा माइयावर विश्वास होता. ग्रामपंचायतीचे काम त्यामुळे अडायला लागले. शंकरची ढवळाढवळा ग्रामपंचायतीत वाढु लागली. तो सरपंचाचा नवरा म्हणुन सर्वत्र मीरवत होता. अंगावर त्याच्या आता नवी कापडं चढली होती. तालुक्याच्या सभेत तोच पुढे पुढे करत होता.
‘‘अनुसये करनं सही’’
‘‘मी नाय, ताइ्रनं सांगितलय वंगाळ काम नाय करायचा’’
‘‘आगं फुकनीचे, हे काम वंगाळ कशापार्इ?’’
‘‘वाडीला रस्ता नको?’’
‘‘तसा कसा?पण काम कोन करणार?’’
‘‘आग तात्यांनीच सांगीतलय’’
‘‘रघुदादा त्यातला न्हाय’’ मला त्यानी स्वत: येऊन तसं सांगितलं तरच मी करेन’’
‘‘मांगच्या वेळेचे संडासाचे पैसे खाल्लेस नव्हं?’’
‘‘कशापार्इ खाल्ले?’’ मग वाडीवर झाले ते काय?
‘‘काय त्याला संडास म्हणायचे का? आणि कोन वापरते ते ?’’
‘‘शोसखड्डा काय, दरवाजे काय?’’ दार लावलीस त्या संडासाची ?’’
‘‘आरे कशापार्इ इकता पैसा खातोस?’’
‘‘ थांब तुइया त्या तार्इला बघतोच एकदा’’
हे असे संवाद वारंवार झडु लागले
दोन तीन वर्षाचा अनूसयेचा सरपंचाचा काळ आम्ही गाजवला ,
तरीही रघुदादानी फायदा घेत अनेक कामे उरकली
अनुसया सहीची धनी. ग्रामसेवक रघूदादाचाच माणुस.
तलाठी आणि ग्रामसेवकानी गावच विकायला काढले होते
आम्ही मोर्चा नेला. चांगले पाच तास दोघांना कोंडुन ठेवले त्यांचेकडून न्यायांचा हिशेब घेतला. बी.डी.ओलाा बोलावले. गावचा निधी सर्वांनी मिळून वाटुन खाल्ला होता.
रघुदादानी आदळाआपट केली. पण स्वतावर प्रकरण येवु नये म्हणुन शंकरला बळी दिला. जामिनीची धावपळ पुन्हा रघुदादानीच केली. ग्रामसेवकाची त्यात नोकरी गेली. तलाठयाचीही बदली झाली. अनुसया त्या दिवशी धाय मोकलून रडली. पण नंतर मात्र ती समर्थ झाली. आज अनुसया माजी सरपंच आहे. पुढे पंचायत समीतीची चालुन आलेली नामी संधी तिने नाकारली. शंकर आता रोड कॉन्ट्रक्टर झालाय. जुने ट्रक घेवुन खडी टाकतो, रेती टोकतो.
अनुसया शापीत देवकन्या आहे. तीने वस्तीला भरभरून दिले. माचीवर मसणुसकी आणली. धर्माच्या नावाखाली प्रचारासाठी आलेल्यांना हुसकावून लावले. आता ती वस्तीवर निवडणुकीचा रात्री कुणालाच येवु देत नाही. दारु बंदीची शपथ वस्तीला घालते.तिने व्यक्तीचे रुपच बदलून टाकले. माझ्या धंदयात त्या आता भागीदार झाल्यात.
वस्तीवरचे देव तीने उखडुन टाकले.बकरा बळी पद्धत बंद केली. भगताचे चाळे बंद केले. नंतर कळले रघुदादानी वेताळाला दाखवलेला दगडी मुर्ती कुण्या मारवाडयाला विकल्या. पण तेव्हा उठाव करायला मी नव्हते आणि माझी अनुसयाही नव्हती.
आता वस्तीवर वेताळ नाचत नाही
की भगत खेळत नाही.
आता वाडीवर चोरी होत नाही,
की पोलिसांची धाड पडत नाही
अनूसया वस्तीची राखणदार बनलेय.
आजही अनुसया जंगलातुन फाटी आणते, मोळया बांधते, गवताचे भारे रचते, फॉरेस्टवाल्यांशी भांडते. त्यांना वस्तीवरून हुसकावते. वस्तीवर आज सण साजरे होतात कॉलेजची मूले वस्तीवर कॅम्प लावतात. त्यांनाही अनुसया धडे शिकवते.
आज अनूसया हे चालते बोलते ‘समाजमंदीर’ झालेय.
उदया कदाचीत माझीही गरज रघूच्या वाडीला उरणार नाही.
मला पूढची वस्ती खूणावतेय..
तिथेही मला दूसरी अनूसया शोधावीच लागेल.
No comments:
Post a Comment